गुलाबो साठी "गुलाब" देताना पाकीट आता जड ठेवा...

"व्हॅलेंटाईन वीक" म्हटलं की एक आठवडा प्रेमात जातो.
प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी गुलाब विशेषता वापरला जातो.
पण आता व्हॅलेंटाईन वीक मुळे गुलाबाच्या फुलाचा दर वाढला आहे.
इतर वेळी ८ ते १० रुपयांना मिळणारे गुलाबाचे फुल आता 40 ते 50 रुपयांपर्यंत महाग झाले आहे
गुलाबाचं फुल असणारे बुके म्हणजेच पुष्पगुच्छ ची किंमत सुद्धा हजारो रुपयांपर्यंत गेली आहे.
त्यामुळे जर तुम्हाला या आठवड्यात गुलाब घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या पाकिटात थोडे पैसे जास्त ठेवावे लागणार आहेत.