मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेते किरण माने सध्या चर्चेत आहेत.
त्यांनी यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढल्याचा आरोप केला जात आहे.
यानंतर त्याच मालिकेत काम करणाऱ्या काही महिला कलाकारांनी त्यांनी महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.
या आरोपानंतर त्याच मालिकेत काम करणाऱ्या काही महिला कलाकार किरण माने यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या होत्या.
किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत. असं कौतुक जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मालिकेतील स्त्री कलाकारांनी किरण मानेंच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. त्यामुळे किरण मानेंवर संशय घ्यायला मला तरी कुठेही जागा दिसत नाही.
असं म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांचे कौतुक केले आहे.