बर्ड फ्लूमुळे (india sees first bird flu death) देशात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
या मुलाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
मुलाला ताप आणि खोकला अशी लक्षणं होती
ही लक्षणं कोविडशी मिळती जुळती असल्यामुळे कोविडचा संसर्ग झाला असावा, असं डॉक्टरांना वाटलं
त्यानंतर चाचण्या करण्यात आल्या, ज्यात त्याला एविएन इन्फ्लुएन्जा (H5N1) म्हणजेच, बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं
उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे
संपर्कात येणाऱ्या दिल्ली एम्समधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे