तब्बल ३९० कोटींचं घबाड, १३ तास अधिकारी मोजत होते पैसे
५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोनं, हिरे तब्बल ३९० कोटींचं घबाड.
जालन्यात प्राप्तीकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे.
जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती.
१ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती.