लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक Covid Vaccination लस केव्हा येणार याची प्रत्येकजण वाट पाहत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याचं म्हटलं जातंय. 
त्यामुळे लहान मुलांच्या पालकांना चिंता होणं स्वाभाविक असून, मुलांच्या लसीकडे त्यांचं लक्ष लागलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांसाठी मार्च 2022 मध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. 
या वर्षी डिसेंबरपर्यंत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 3 ते 4 लसी मंजूर केल्या जाऊ शकतात.
भारत बायोटेकच्या लसीची चाचणी 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी सुरू आहे.
ही लस या वर्षी सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे.