बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे आज त्यांच्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
या खास प्रसंगी शिल्पाने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत राजला शुभेच्छा दिल्या आहेत.
12 वा वाढदिवस साजरा करत असताना शिल्पाचे राजसाठी पत्र देखील लिहिले आहे..
12 वर्षांपूर्वी या दिवशी आणि याच क्षणी, आम्ही एकमेकांना वचन दिले होते की आम्ही सुख-दु:खात सोबत राहू, कठीण प्रसंगांना एकत्र सहन करू...
प्रेम आणि देव आपल्याला मार्ग दाखवेल असा विश्वास ठेवा..
सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार ज्यांनी प्रत्येक सुख-दु:खाच्या आणि कठीण प्रसंगी आपल्या सोबत साथ दिली. अस तीने म्हंटले आहे.