तर, सप्टेंबर अखेरपर्यंत कडक निर्बंध लागू होणार
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं अंदाज वर्तवला जात आहे.
त्यामुळे मुंबईत प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
अशातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. 
सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्ण वाढल्यास कडक निर्बंध होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तूर्तास तरी नाईट कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदीची गरज नसल्याचं सुद्धा शेख म्हणाले.
काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.