ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन नसल्याने,अशा नागरिकांना लस घेताना अडचणींना सामोरे जावं लागतं आहे.

मात्र पहिला डोस घेतल्याचा प्रमाणपत्र नसल्यास घाबरून जाण्याचं कारण नाही.
दुसरा डोस घेताना पहिल्या डोस घेतावेळी दिलेला मोबाइल नंबर लक्षात ठेवावा.
लसीकरण केंद्रावरील डेटामध्ये तुमच्या नंबरची नोंद असते, त्यावरूनही नाव शोधता येते.