पावसाळ्यात आपल्या आरोग्यासह पायांची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. 

पावसाळ्यात अनेकदा पाण्यातून जाण्याची वेळ असते.

त्यामुळे अशावेळी पायांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

पायांची काळजी घेण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.

पावसाळी सॅण्डल्स फार घट्ट किंवा कडक असू नयेत.

बंद प्रकारातले किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅण्डल्स वापरु नयेत.

प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सॅण्डल्स थोडावेळ काढून ठेवावेत.

पाण्यामुळे तळपायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापण्याचा प्रयत्न करु नये. 

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत आणि पुसून कोरडे करावेत