राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या आठवड्यात राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम
यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे.