शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी ट्राय करा 'हे' सुपरफूड
खजूरमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते जे हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतात. यामध्ये विटॅमीन सी, बी आणि कॉम्प्लेक्स, फॉलिक अॅसिड असते. यामुळे लाल पेशी वाढण्यास मदत होते.
बेदाणे लोह आणि कॉपरचा एक मोठा स्त्रोत आहे, असे म्हटलं जातं. ज्यामुळे लाल पेशी वाढण्याची शक्यचा असते. शिवाय यामुळे हिमोग्लोबीनते प्रमाणही वाढते.
अनेक अभ्यास आणि संशोधनातून बाजरी खाणे शरीरासाठी आरोग्यदायी असते हे सिद्ध झाले आहे. यामुळे हिमोग्लोबीनच्या सीरम आणि फेरिटिनच्या पातळीत सुधारणा होते. यामुळे अॅनिमिया सारखे आजार दूर ठेवता येतात.
तीळच्या बियांमध्ये लोह, फॉलेट आणि फ्लेवोनोईड्स अशा पोषक तत्वाचे प्रमाण असते. जे शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्याचे भूमिका बजावतात.
यासगळ्यासह जांभुळही हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करते. याशिवाय विविध डाळी, चिंच, गूळ आणि भुइमगाच्या शेंगाही हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतात.