‘राणादा’ व ‘पाठक बाई’ लग्न बंधनात
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
ते दोघेही सोशल मिडीयावर सक्रीय असतात.
त्या दोघांचा ही सोशल मिडीयावर मोठा चाहता वर्ग आहे.
ते आपल्या चाहत्यांकरीता सोशल मिडीयावर फोटो शेअर करत असतात
हार्दिक व अक्षया यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे.
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी हार्दिक व अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.
अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.