ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
यानंतर उमेदवारांना लेट फी भरून नोंदणी करावी लागेल.
त्यामुळे तुम्ही अजुन ही नोंदणी करायची असेल तर अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता.
iitkgp.ac.in, gate.iitd.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता.
अर्ज भरताना काही त्रुटी असल्यास संस्थेकडून अर्ज दुरुस्ती विंडो 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत उघडली जाईल.
12 नोव्हेंबरपर्यंत पेपर, कॅटेगरी किंवा परीक्षा केंद्र या पर्यायामध्ये दुरुस्ती करता येईल.
परीक्षेचे आयोजन 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 ला केले जाणार आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो.