'फोर मोअर शॉट्स' फेम मानवी गगरु विवाहबंधनात अडकली, छायाचित्रे आली समोर

अभिनेत्री मानवी गगरु विवाहबंधनात अडकली आहे.
तिचा बॉयफ्रेंड अभिनेता आणि कॉमेडियन कुमार वरुणसोबत लग्न केले आहे.
या लग्नाचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर केला आहे.
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वरुणसोबतच्या लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
लग्नाला दोघांचे फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
लग्नाच्या फोटोंमध्ये मानवीने लाल रंगाची साडी परिधान करून सुंदर दिसत आहे.
दुसरीकडे, वरुणने क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे, ज्यामध्ये तो देखणा दिसत आहे.