प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव अडचणीत सापडला आहे.
अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप करत त्याची पत्नी स्नेहा चव्हाण हिने पोलिसात धाव घेतली आहे.
पोलिसांनी अनिकेत आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही स्नेहा चव्हाणने केला आहे.
विश्वासरावला त्याच्या आई आदिती आणि वडिल चंद्रकांत यांनी वेळोवेळी साथ देण्याचं काम केलं असल्याचं तिने तक्रातीत म्हंटल आहे.
पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.