कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा ऑनलाईन पद्धतीनेच भरत आहेत.

मात्र,फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारण्यासारखे प्रकार घडत आहेत.
पण अशा शाळांवर आता कारवाई होणार असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारणे, शाळेतून काढून टाकणे, निकाल रोखून ठेवणे, परीक्षेला बसू न देणे अशाप्रकारच्या तक्रारी आल्यास...
बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वर्षा गायकवाड यांनी दिली.