अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
फोर्टीस हेल्थकेअर कंपनीचे प्रमोटर मलवींदरसिंग आणि शिवेंद्रसिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पत्नीची सुरेश चंद्रशेखर यांनी फसवणूक केली होती.
या सर्व प्रकरणात चंद्रशेखर यांना मदत केल्याचा आरोप लीना मारिया यांच्यावर आहे.
याच प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस या अभिनेत्रीची साक्षिदार म्हणून चौकशी करण्यात आली होती.
लीना मारिया ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. मद्रास कॅफे हा तिचा सर्वात गाजलेला चित्रपट आहे.
लीना मारिया हिच्याकडे अफाट संपत्ती असल्याचे आत्ता पर्यंत तपासात सिद्ध झाले आहे.