आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
बॉलिवूड सेलिब्रिटींचे लाइफस्टाइल, मानधन याबद्दलही बरीच चर्चा होताना दिसते.
अभिनयासोबतच सेलिब्रिटी इतर माध्यमातूनही अनेक पैसे कमावतात.
आज आपण बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
दीपिका पदुकोणपासून ते आलिया भट्टपर्यंत एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी अभिनेत्रींना किती पैसे मिळतात यावर एक नजर टाकूया.
‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ७९.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असून एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती १.८० कोटी रुपये मानधन घेते.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
दीपिकाचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.
इन्स्टाग्रामवर दीपिकाचे ६७.४ मिलियन फॉलोवर्स असून एका पोस्टसाठी ती १.५ कोटी रुपये घेते.
‘गंगुबाई काठियावाडी’, ‘राझी’, ‘कलंक’ या चित्रपटांतून आलियाने अभिनयानाची जादू दाखवून दिली.
आलियाचे इन्स्टाग्रामवर ६६.४ मिलियन फॉलोवर्स असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका पोस्टसाठी आलिया एक कोटी रुपये मानधन घेते.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा चाहता वर्ग मोठा आहे.
कतरिना सोशल मीडियावर सक्रीय असून एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती ९७ लाख रुपये मानधन घेते.
कतरिनाचे इन्स्टाग्रामवर ६५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
अनुष्काचे इन्स्टाग्रामवर ५९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी अनुष्का ९५ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच चर्चेत असते.
करीना सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इनस्टाग्रामवर ९.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका पोस्टसाठी करीना एक कोटी रुपये मानधन घेते.