'या' शहरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण

देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.
मात्र केरळमध्ये (Kerala) कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत 22 हजारांपेक्षाही अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. 
तर गेल्या 24 तासांत 128 जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमधील स्थिती पाहता केंद्र सरकारच्या वतीनं 6 सदस्यांचं पथक पाठवण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नव्याने आढळणारी रुग्णसंख्यादेखील वाढत आहे.