आज बुधवारी देशात कोरोनाचे ३ हजार ३०९ नवीन रुग्ण आढळले आहेत.
हे कोरोनाचे आकडे मागील 47 दिवसांतील उच्चांकी आहेत.
यापूर्वी गेल्या महिन्याच्या 11 तारखेला 3 हजार 614 कोरोनाचे रुग्ण समोर आले होते.
गेल्या 24 तासांत 17 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला असून 2 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत.
अशा प्रकारे सक्रिय रुग्णांची संख्या आता 15 हजार 669 झाली आहे.