प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या चित्रपटात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा या चित्रपटावरुन विशेष पोक्सो कोर्टात तक्रार दाखल झाली आहे.
भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
भारतीय दंड विधान 156(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.