बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. 
मुंबई, कोकणासह मराठवाडय़ात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 
काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता.
पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झालेत.
त्यामुळे मुंबईसह उपनगरे, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता.
काही भागात वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता.