ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता...
हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला
राज्यात पुढील दोन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पुढील काही तासांत पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.