कोरोनामुळे मुंबईत लोकल प्रवासाला सर्वसामान्यांना बंदी कायम आहे.

लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी आहे. 
मात्र, एमपीएसी परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे.
उमेदवारांना 4 सप्टेंबरला परीक्षेसाठी रेल्वेतून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.
MPSC परीक्षेसाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.
त्यानुसार परीक्षेसाठी एमपीएसीच्या उमेदवारांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.