वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्या. गनेडीवाला यांचा राजीनामा
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गनेडीवाला यांनी दिलेले दोन निर्णय मोठे वादग्रस्त ठरले होते.
‘स्कीन टू स्कीन टच’ हा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. या निर्णयामुळे त्यां चर्चेत आल्या होत्या. 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेला हा निर्णय रद्द ठरवला होता. 
पुष्पा गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी कायम करण्याची शिफारस देखील मागे घेण्यात आली होती.