बॉलिवूडमधील अ‍ॅक्शनस्टार रोहित शेट्टी याचा आज वाढदिवस

बॉलिवूडमधील अ‍ॅक्शनपट म्हटले की, जो चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे रोहित शेट्टी.
हवेत उडत्या गाड्या आणि वेगवेगळे स्टंट हे रोहित शेट्टीच्या चित्रपटाचे विशेष आकर्षण असते.
रोहित शेट्टी आज म्हणजेच १४ मार्च रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
रोहितने वयाच्या १७ व्या वर्षी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
रोहित शेट्टीने 2003 साली 'जमीन' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.
रोहित शेट्टीने आतापर्यंत 'सिम्बा', 'सूर्यवंशी', 'सिंघम', 'चेन्नई एक्सप्रेस'सह अनेक हिट चित्रपट दिले.