‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथचं बोल्ड फोटोशूट
लोकप्रिय अभिनेत्री मीरा जगन्नाथ ‘बिग बॉस मराठी ३’ शोमुळे घराघरात पोहोचली.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील तिने साकरलेली ‘मोमो’ ही व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.
मीराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच मीराने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
फोटोमध्ये मीराने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
विविध पोझमधील या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मीराच्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
मीरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.