भारताला कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्रे त्यांच्या क्षमतेच्या निम्म्याहून कमी उत्पादन करत आहेत.
टाटा पॉवरने गुजरातमधील मुंद्रा येथील कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पातून उत्पादन बंद केले आहे.
अतिवृष्टीमुळे कोळशाच्या वाहतूकीवर परिणाम झाला असुन कोळशाच्या किमती देखील गगनाला भीडल्या आहेत.
देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी अतिवृष्टीमुळे कोळशा खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत घेऊन जाण्यात अडचनी.
गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे.
फक्त दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याचा दावा करत वीज उत्पादक आणि वितरकांनी वीज कपातीचा इशारा दिला आहे.
माञ देशात पुरेसा कोळशाचा साठा आहे व माल सतत भरला जात असल्याचे कोळसा मंत्रालयाचे म्हटलं आहे.