दिल्लीतील सर्व खाजगी शाळांनी त्यांची फी 15 टक्क्यांनी कमी करावी, असे आदेश सरकारने दिले आहे.
गेल्या वर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी म्हणजेच 2020-21 साठी हा आदेश लागू असेल.
जर शाळांनी पालकांकडून अधिक शुल्क आकारले असेल तर ते पैसे परत करावे लागतील असेही आदेशात म्हटले आहे.
पैसे परत करता येत नसेल तर पुढील वर्षाच्या फी मध्ये एडजेस्ट करून घेता येईल.
केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाकाळात पालकांना दिलासा मिळणार आहे.