भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाच्या काळातही एका लेस्बियन जोडप्याने सुंदर नातं प्रस्थापित केले आहे.
सुफी मलिक आणि अंजली चक्र असे या सुंदर जोडप्याचे नाव आहे.
सुफी मलिक आणि अंजली चक्र यांची कॅलिफोर्नियातील टम्बलरवर भेट झाली.
चक्र एक कार्यक्रम नियोजक आहे, आणि मलिक एक कलाकार आहे.
दोघींची मैत्री जोडपं बनण्याच्या 7 वर्षांपूर्वी टम्बलरवर एकमेकांच्या ब्लॉगला फॉलो करण्यापासून सुरू झाली आणि नंतर त्या इंस्टाग्रामवर एकमेकींशी जोडल्या गेल्या.
छायाचित्रकार सरोवर अहमद यांनी 'अ न्यू यॉर्क लव्ह स्टोरी' या कॅप्शनसह या दोघींची छायाचित्रे ट्विट केली आणि त्याला 50,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
मलिक आणि चक्राने एका आठवड्यानंतर स्वतःचे आणखी फोटो पोस्ट केले, जे व्हायरलही झाले. लोकांना हे लेस्बियन कपल खूप आवडू लागले आणि त्या दक्षिण आशियाचं कपल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
मलिक आणि चक्राने एका आठवड्यानंतर स्वतःचे आणखी फोटो पोस्ट केले, जे व्हायरलही झाले. लोकांना हे लेस्बियन कपल खूप आवडू लागले आणि त्या दक्षिण आशियाचं कपल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
हे जोडपे म्हणजे दोन भिन्न धर्मांचे मिश्रण आहे. मलिक ही मुस्लिम-पाकिस्तानी आहे, तर चक्र हिंदू-भारतीय आहे.