नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री सारा अली खानने ग्रीन कार्पेटसाठी काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता.
अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या ग्लॅमरस लूकने यावेळी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अभिनेत्री लारा दत्ताचा देखील नवा लूक आफच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला.
शर्वरी वाघच्या सुंदर लूकची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.
अभिनेता टायगर श्रॉफने या पुरस्कार सोहळ्यासाठी परिधान केलेला गुलाबी रंगाचा सुट अधिक लक्षवेधी होता.
अभिनेता शाहिद कपूरच्या हटके लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
तसेच सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान यांनी देखील ग्रीन कार्पेटवर हजेरी लावली होती.
अभिनेता बॉबी देओलने फोटोसाठी विविध पोझ दिल्या.
यो यो हनी सिंगचा लूक यावेळी अधिक चर्चेचा विषय ठरला.
आयफामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या जोडीने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
अभिनेत्री सई ताम्हणकरच्या आयफा लूकची तर सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे.