रश्मी ठाकरेंना अमृता फडणवीसांचा टोला म्हणाल्या, "सामना छान रंगवता..."
‘बस बाई बस’ शोमध्ये अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली
या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा फोटो दाखवण्यात आला.
रश्मीचा फोटो दाखवल्यानंतर अमृता यांनी त्यांना “ कशा आहात? सगळं ठीक आहे ना?” असं विचारलं.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या रश्मी ठाकरे संपादिका होत्या. त्यामुळे अमृता यांनी “सामना छान रंगवत आहात”, असा टोला लगावला.
पुढे त्या म्हणाल्या, तुम्ही ज्याप्रकारे घर सांभाळत आहात, त्याबद्दल मला आदर वाटतो. त्यातून मला खूप शिकायलाही मिळतं.
बाकी चढ-उतार सुरुच राहतात. पण, आपण नेहमीच मैत्रिणी राहू, असंही अमृता म्हणाल्या.