रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
आता बातम्या येत आहेत की 13 किंवा 14 एप्रिलपासून यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
चेंबूरच्या 'आरके हाऊस'मध्ये लग्नाआधीचे दोन्ही सोहळे आणि भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे.
3-4 दिवसांच्या सोहळ्यानंतर 17 एप्रिलला रणबीर-आलिया पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, वेडिंग वेन्यू आरके हाऊसमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.