राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाकाळात स्पर्धा परीक्षांसाठी वर्षभर जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे वयाच्या निकषात बसू न शकणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
यंदा होणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल बुधवारी घेतला आहे.
येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठी देखील हा निर्णय लागू होणार आहे.
त्यामुळे राज्यातील परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाल्याचे सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.