एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ.
खडसे कुटुंबाच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये.
खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीने समन्स पाठवलं आहेत. 
त्यांना आज (18 ऑगस्ट) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 
पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावलं गेलं आहे.
मंदाकिनी खडसेंच्या चौकशीदरम्यान काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.