दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.

हा विषाणू वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या  शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती.

या विषाणूच्या व्हेरिएंटला C.१.२ असं नाव देण्यात आलं आहे. 

हा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आढळून आला.