रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)हा सण 22 ऑगस्ट म्हणजेच आज रविवारी साजरा केला जाईल.
या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि स्वतःचे रक्षण करण्याचे वचन घेतात.
तर एका भावाने आपल्या बहिणीसाठी असे काही केले आहे की सगळे त्याचे कौतुक करत आहेत.
हरियाणाच्या रोहतक येथील 31 वर्षीय महिलेला तिच्या भावाने किडनी दिली आहे. 
मोठ्या बहिणीला किडनी दान करून भावाने जीवनदान दिले आहे.
रक्षाबंधनाला (Raksha Bandhan) बहिणीसाठी यापेक्षा चांगली भेट काय असू शकते.