देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.

मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोना संसर्ग होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
देशभरात लसीचे दोन डोस घेतलेल्या जवळपास 87 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
यापैकी 46 टक्के रुग्ण हे एकटय़ा केरळ राज्यातील आहेत.
तर उर्वरित 54 टक्के कोरोनाग्रस्तांची देशाच्या वेगवेगळ्या भागांत नोंद झाली आहे.
त्यामुळे या आकडेवारीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चिंता भलतीच वाढली आहे.