मुंबईतील 'या' भागात एकाचवेळी 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे महाराष्ट्राला हायअलर्ट देण्यात आला आहे. 
कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
आता लहान मुलांना कोरोनाने टार्गेट केल्याचं समोर आलं आहे. 
मानखुर्दमधील चिल्ड्रन होममध्ये 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह ( corona positive ) आढळून आली आहे.
एकाच वेळी 18 मुलं पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे.
या सर्व मुलांना चेंबूर आणि वाशी नाका येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
मुलांची यादी करण्यात आली असून तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.