तरुणीच्या छेडछाडीवरुन युवकाची हत्या

नागपुरातील हत्यांचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. 

धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरुन युवकाची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

मृत्यू झालेल्या कमलेशने काही दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे.

यावरूनच त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.