ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याभोवती सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे
बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केली म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणनार्या एका मुलीचा व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
“त्यांनी सर्वांना घरात थांबण्यास सांगितलं, पण लॉकडाउनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन ते पार्टीसाठी गेले होते. त्यांनी यासाठी माफी मागितली पाहिजे”. असं ही मुलीचा म्हणत आहे.
जर ती भारतात असती तर यूएपीए अंतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता असं ट्वीट आव्हाड यांनी केले आहे..