तरुणींना भावतोय का राहुल गांधी?
X
सध्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने जनतेशी संवाद करु लागले आहे त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. बुधवारी चेन्नईतल्या एका कॉलेजमध्ये विद्यार्थींनींशी राहुल यांनी संवाद साधला असता विद्यार्थींनी प्रश्न विचारताना राहुल सर असं म्हणतं सुरुवात केली मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी कॉल मी राहुल असं सांगितल्यास उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकला... खरं तर राहुलने ज्या पद्धतीने तरुणींशी संवाद साधला आणि तरुणींनी त्यांना दिलेला प्रतिसाद पाहून तरुणींना राहुल गांधी भावतोय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गौवळनींमध्ये असलेल्या कृष्णासारखे राहुल गांधी बुधवारी पाहालयला मिळाले.. राहुलचं जरी वय पन्नाशी गाठत असलं तरी त्याच्या टीशर्ट-जीन्सच्या ड्रेसिंग स्टाईलने अनेक तरुणींना वेड लावले आहे... त्याच ते बोलणं... हसणं... एका कॅज्युल लूक मध्ये राहुलने विद्यार्थींनीशी साधलेला संवाद अगदी मनवेडा करणारा होता.
ऐरवी राहुलला पप्पू म्हणून चिडवणारेही त्यांचा हा व्हिडिओ पाहून त्यांच्या प्रेमात पडतील असा हा व्हिडिओ आहे. पाहा हा व्हिडिओ...
एखादया हिरोप्रमाणे राहुल गांधींची प्रतिमा तरुणींच्या मनाच छाप पाडू लागली आहे. आपण गेल्या पाच वर्षात राहुलमध्ये झालेला बदल पाहिला तर जमीन आसमान चा बदल दिसेल... मम्माज बॉय, पप्पू म्हणून सुरु झालेला प्रवास आता तरुणींच्या मनाला भावेल इतपर्यंत येऊन जरी पोहचला असला तरी राजकारणातही तितकीच क्रेझ, पकड त्यांनी ठेवली आहे... अगदी नरेंद्र मोदींना त्यांची नेहमी दखल घ्यावीच लागते अश्या हा म्माज बॉय आता जनता वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू लागली आहे... त्यातच येत्या काळात तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राहुलला निवडणुकांसाठी याचा नक्की मोठा फायदा होणार का हे येत्या निवडणूकीत स्पष्ट होईल.