Home > रिपोर्ट > WPL : पहिल्याच सामन्यात स्मृतीची दमदार खेळी

WPL : पहिल्याच सामन्यात स्मृतीची दमदार खेळी

WPL : पहिल्याच सामन्यात स्मृतीची दमदार खेळी
X

पुरुषांच्या आयपीएल नंतर आता महिलांच्या आयपीएलला सोमवार पासून दणक्यात सुरुवात झाली . पुरुषांच्या आयपीएल मध्ये काही शिल्लक लढती राहिल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची नजर #WomensT20Challenge याकडे वळली आहे. सोमवारी झालेल्या लढतीमध्ये स्मृती मंधानाच्या ट्रेलब्रेझर आणि हरमनप्रीत कौर हिच्या सुपरनोव्हास यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.

या अटीतटीच्या सामन्यात अखेर स्मृती मंधानाच्या ट्रेलब्रेझर संघाने सुपरनोव्हासवर फक्त दोन धावांनी विजय मिळवला. दरम्यान हरमनप्रीतच्या सुपरनोव्हस हिच्या संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली यात स्मृतीनं तुफान खेळी करत 90 धावांच्या खेळीच्या जोरावर सुपरनोव्हास समोर 141 धावांचे आव्हान ठेवले होते. स्मृतीनं यावेळी 67 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 90 धावांची खेळी करून संघाला यश मिळवून दिले.

https://twitter.com/IPL/status/1125448032177102852

Updated : 7 May 2019 6:50 AM GMT
Next Story
Share it
Top