Home > रिपोर्ट > महिलांचा बाजार

महिलांचा बाजार

महिलांचा बाजार
X

[gallery type="thumbnails" size="medium" ids="7635,7638"]

हे सर्व फोटोग्राफ्स पाहिलेत तर वाटेल की बाजार भरलाय. खूप वस्तू आहेत आणि खरेदी सुरू आहे. पण नीट पहा तर दिसेल की या बाजारात फक्त महिला दुकानदार आहेत. हे आहे मणिपूर मधले प्रसिध्ध इमा मार्केट अथवा मदर मार्केट. इंफाळ शहराच्या मधोमध वसलेले हे मार्केट जवळ जवळ 500 वर्षे जुने आहे. 16व्या शतकात मणिपूर मध्ये मैतेय सलालप काबा नावाची पद्धधत होती. ज्यात पुरुषांना युद्धध खेळण्यासाठी अथवा नवीन जिंकलेले प्रदेश कसण्यासाठी दूर पाठवले जात असे. बायका गावात एकट्याच राहायच्या. त्यामुळे कुटुंब आणि घराची शेती सांभाळणे हे त्यांच्या अंगावर पडले. घर चालवण्यासाठी त्यांना शेतीचे उत्पन्न बाजारात विकावे लागे. त्यावेळी एकत्र येऊन शहराच्या मध्यभागी बसून त्या अनाज विक्री करू लागल्या आणि या बाजारावही सुरुवात झाली. थोडीशी गरजे पोटी. परंतु हळू हळू या बाजारात अनेक वस्तू मिळू लागल्या. पारंपारिक मणिपुरी खाद्य पदार्थ आणि घरगुती विणलेला कपडा यांच्या विक्रीचे हे मुख्य केंद्र बनले.

वर्षानुवर्षे ही प्रथा अशीच प्रसारात राहिली आणि माणिपूरच्या इतर शहरांमध्येही अशी निमू कथेल अथवा इमा कथेल सुरू झाले. फक्त बायका असल्याने इथे शॉपिंग करणे पण फार मजेचे असते. खाद्य पदार्थ विकताना आग्रहाने त्यांचे टेस्टिंग करवले जाते. सुक्या मासळीच्या पदार्थांची मणिपुरी लोकांची खासियत आहे. अनेक तऱ्हांची सुकी मासळी येथे मिळते. हजारो तऱ्हांच्या भाज्या मिळतात. मुळात आदिवासी असल्याने कंदमुळे खायची इथली पद्धधत आहे. तुम्हाला गप्पा मारायला आवडत असतील तर ही कंदमुळे आणि त्यांमुळे होणारे दुखान्यांवरचे इलाज तुम्हाला ऐकायला मिळतील.

मणिपुरी सिल्क च्या साड्या ही ह्याच मार्केटमध्ये तुम्हाला दिसतील. घरोघरी विणलेल्या सुंदर शाली, मफलर, धोतरे अशा सर्व वस्तू आधुनिक माँल्स पेक्षा जास्त सुंदर रीतीने इथे सजलेल्या दिसतील. कुठे लग्नाची खरेदी सुरू असेल तर लग्नगीते गात गात मेखला नेसून दाखवल्या जातात.

2010 मध्ये इंफाळ मधल्या या मार्केटला सिमेन्ट ची इमारत बनवून पक्के केले गेले. परंतु त्याचे बाह्य स्वरूप मात्र मणिपुरी इमारती सारखेच ठेवले आहे. तेव्हापासून जवळ जवळ 4000 बायका येथील दुकाने चालवतात.

आजकाल स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक कथा आपण ऐकतो. पण स्त्रीचे हे व्यवसायात आणि कुटुंबात अधिकाराचे स्थान येथे खऱ्या अर्थाने पहाता येते. मातृसत्ताक पद्धधती नसूनही स्त्रियांचा कुटुंब प्रमुखाचा अधिकार पुरुषांनीही मान्य केलेला दिसतो. व्यवहारात आणि घरात मदतनीसाची भूमिका पुरुष आनंदाने बजावताना दिसतात.

या बायकांशी कधी बोलून पहा, त्यांना कुटुंबात जबाबदार व्यक्ती म्हणून राहणे मंजूर आहे. पण घरातल्या मुलांनी शिक्षण घ्यावे, काही प्रोफेशनल काम करावे आणि अतिरेकी गटात सामील होऊ नये असे त्यांना मनापासून वाटते. अखंड भारताचा भाग व्हायचे का नाही इथपासून सुरू झालेली चळवळ पुढे AFSPA (armed forces Special powers act) च्या मुळे चघळत गेली आणि आणि बायकांची जबाबदारी ही.

जेव्हा सामाजिक संतुलन बिघडत गेले तेव्हा बायकांनीच पुढाकार घेऊन AFSPA च्या विरोधात आंदोलनेही केली.

इरोड शर्मिला आणि मीरा पेपी सारख्या कणखर ऍक्टिव्हिस्ट्स किंवा मेरी कॉम सारखी कुशल खेळाडू याच परंपरेतून तयार झाल्या.

तेव्हा मणिपुरी समाजाचा आरसा असलेले इमा मार्केटमध्ये एकदा जरूर जाऊन या!

Updated : 15 Dec 2019 6:25 AM GMT
Next Story
Share it
Top