Home > रिपोर्ट > महिलांनो, खेळा बॅडमिंटन...

महिलांनो, खेळा बॅडमिंटन...

महिलांनो, खेळा बॅडमिंटन...
X

घरतली कामंं, ऑफिस करत असताना खेळ खेळायचा कुठे हो... आता हे काय खेळायचे वय आहे का... इच्छा झाली तरी कसलं काय हो... बालपणी काही खेळ खेळले असतील तेवढेचं असं प्रत्येक महिलांच उत्तर असतं खेळ खेळता का हो असा प्रश्न विचारल्यावर... मात्र महिलांसाठी मुंबईतल्या माटुंगा जिमखाना येथे महाराष्ट्र राज्य महिला बॅडमिंटन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन विश्वसुंदरी अदिती गोवित्रीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ही स्पर्धा ही २६ एप्रिल ते २८ एप्रिल पर्यंत भरवली जात असून महिलांमध्ये खेळाडूवृत्ती जोपासली जावी यासोबतच महिलांमधील दडलेल्या खेळास प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी ही स्पर्धा भरविण्यात येत असते यात महिला सशक्तीकरणाचा अभिनव संदेश दिला जात असतो यामुळे महिलांमधील सुप्त क्रिडागुणांना वाव मिळाल्याचे दिसून येते.

Updated : 27 April 2019 7:26 PM IST
Next Story
Share it
Top