Home > रिपोर्ट > पाण्यासाठी जीव गमावलेल्या महिलांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

पाण्यासाठी जीव गमावलेल्या महिलांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

पाण्यासाठी जीव गमावलेल्या महिलांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
X

दुष्काळी भागातील भीषणता वाढतच असल्यामुळे महिलांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा मोळवणे यांची भेट घेतली. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरयांची भेट झाली नसून त्यांच्याशी दूरध्वनीवरून सवांद साधून महिलांच्या समस्या मांडल्या. सोलापूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्हयातील दुष्काळी भागातील महिलांच्या समस्या जाणून त्यांनी आयोगासमोर मांडल्या.

पाण्यासाठी दुष्काळी भागातील महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अश्या समस्यांना सामोरे जाताना अनेक महिलांचा मृत्यूही झाला आहे, याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. दुष्काळी भागात लोकसंख्या खूप आहे मात्र तेवढ्या प्रमाणात पाण्याच्या टॅंकरची संख्या नाही. त्यामुले चारा छावण्यांमध्ये गुरांना आणि माणसांना एकाच ठिकाणी पाणी दिले जात आहे. त्यातून उद्दभवणारे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठया प्रमाणात वाढला आहे. या तीनही जिल्ह्यात महिलांना साथ देण्याची गरज असून सरकारने योग्य ती भूमिका बजावली पाहिजे , त्याचबरोबर त्यांच्या मूलभूत गरजा स्वच्छ पाणी, टॉयलेट, त्यांच्या मुलांना अन्न, त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांना अनुदान देण्याची मागणी असून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे असं चित्रा वाघ यांनी सांगितले. दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जाते मात्र त्याची माहिती चारा छावण्यांमध्ये दिली जात नाही, त्यामुळे ग्रामसेवकांच्या माध्यमातून ही माहिती गावागावात देण्याची गरज आहे.

https://youtu.be/pxwQMMtadxg

Updated : 21 May 2019 5:43 AM GMT
Next Story
Share it
Top