Home > रिपोर्ट > टॉलीवुड फेम अभिनेत्री विजया निर्मला यांचं निधन

टॉलीवुड फेम अभिनेत्री विजया निर्मला यांचं निधन

टॉलीवुड फेम अभिनेत्री विजया निर्मला यांचं निधन
X

टॉलीवुड सिनेमा फेम अभिनेत्री आणि डायरेक्टर विजया निर्मला यांचं निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या असून त्यांनी अखेरचा श्वास हैदराबाद येथील निवासस्थानी घेतला. वेतरन अभिनेत्री निर्मला यांनी 200 हून अधिक तेलगू, तामिळ आणि मलयालम सिनेमात काम केलं आहे. तसेच त्यांनी 40 सिनेमांचे दिग्दर्शन ही केलं आहे.

चांगल्या कामामुळे निर्मला यांची नोंद गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्स झाली. त्यांच्या अश्या जाण्याने टॉलीवुड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांना ही बातमी कळतातच त्यांनी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. निर्मला यांच्या पश्चात नवरा कृष्णा आणि मुलगा नरेश आहेत.

Updated : 27 Jun 2019 5:45 AM GMT
Next Story
Share it
Top