Home > रिपोर्ट > अरेरेरे... Tiktok बॅन झाला

अरेरेरे... Tiktok बॅन झाला

अरेरेरे... Tiktok बॅन झाला
X

टिकटॉकच्या व्हिडिओची चांगलीच धम्माल सोशल मीडियावर सुरु होती. ज्याच्या त्याच्या तोंडी टिकटॉकची चर्चा असायची. सिनेमाचे डायलॉग्स असो, गाणी असो किंवा म्युझिक, १५-३० सेकंदात फुल्ल धम्माल या टिक टॉकवर सुरु असते. तरुण मुलींनाच नाही तर अनेक सेलिब्रिटींनाही या ऍपनं भुरळ घातलीय.

दरदिवशी वाढत जाणाऱ्या फॉलोअर्समुळं तर प्रत्येकालाच आपण सेलिब्रिटी असण्याचा फिल येतोय, पण आता हे सगळं बंद होणाराय. कारण टिक टॉक ऍप गुगल आणि ऍपलवरुन डिलीट करायचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. भारतात टीक टॉकचा गैरवापर होत असून अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येतोय. या अश्लिल मजकुरावर तात्काळ बंदी आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . पण केंद्राच्या या निर्णयामुळं तरुणाईमध्ये नाराजी पसरलीय. टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यात तरुण मुलींचेही प्रमाण अधिक आहे.

Updated : 17 April 2019 9:26 AM GMT
Next Story
Share it
Top