या महाराष्ट्राच्या महिलांना मिळाली दिल्लीत शाबासकीची थाप
X
दिल्लीत महिला दिनानिमीत्त राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील नारीशक्तीचा गौरव करण्यात आला. या महिलांमध्ये सहा महाराष्ट्रीयन महिलांचा समावेश आहे.
यामध्ये
१) राहीबाई पोपेरे – ‘बीजमाता’ देशी बियाणे बँक स्थापन करण्याचे मोठे काम राहीबाईंनी केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता. त्यामुळे बीजमाता म्हणून त्या परिचित आहेत.
२) चेतना गाला सिन्हा – अर्थशास्त्राच्या प्राध्यापक राहिलेल्या चेतना गाला सिन्हा यांनी आपली नोकरी सोडून देत ग्रामीण भागातील महिलांसाठी बॅंकेची स्थापना करुन महिलांना सक्षम करण्यासाठी वित्तपुरवठ्यासाठी त्यांनी मानदेशी फाउंडेशनची स्थापना केली.
३) कल्पना सरोज – कमानी ट्यूब्स लिमिटेड च्या अध्यक्ष असलेल्या कल्पना सरोज या बुलढाण्यासारख्या ग्रामीण भागातून मुंबईत आल्या. त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीला नफ्यात आणण्याचे काम केले. आज त्यांच्या बॅकेचा टर्नओव्हर साधारण 300 कोटीच्या आसपास आहे. त्यांनी स्वत: सक्षम होतानाच अनेक महिलांना रोजगार देत एक स्वालंबनाचा आदर्श जगासमोर ठेवला. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
.
४) सीमा मेहता – सीमा मेहता कथ्थक क्षेत्रातील एक मोठं नाव. त्यांनी ही आपली कला स्वत: पुरतीच मर्यादीत न ठेवता इतर मुलींना कथ्थक तर शिकवलेच मात्र कथ्थकाला त्यांनी उपजीवीकेचे साधन बनवण्यास प्रेरीत करण्याचे महत्वाचे कार्य सीमा मेहता आज ही करत आहेत.
५)सीमा राव – सीमा राव... महिला कमजोर नसतात. हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या सीमा राव. सीमा महिलांना कमांन्डो ट्रेनिंग देतात तसेच आत्तापर्यंत त्यांनी अनेक सशस्त्र सैनिकांना प्रशिक्षीत केले आहे.
६)स्मृती मुरारका - बनारस येथील विणकाम कौशल्य पुर्नविकसीत करत तरुणांना विणकामासाठी प्रेरित करत आहेत.