Home > रिपोर्ट > 'या' कारणामुळे राणू मंडलवर आले पुन्हा स्टेशनवर गाण्याचे दिवस?

'या' कारणामुळे राणू मंडलवर आले पुन्हा स्टेशनवर गाण्याचे दिवस?

या कारणामुळे राणू मंडलवर आले पुन्हा स्टेशनवर गाण्याचे दिवस?
X

आपल्याला मिळालेले यश कसं टिकवायच हे पुर्णपणे आपल्याच हातात असतं. जे यशाच्या शिखरावर जाउन खाली आपटले आहेत. ज्यांना त्यांच्या चुकांमुळे भविष्यातील चांगल्या संधीना मुकावं लागलय असे अनेक जण आपण पाहिले असतील. यांमध्ये बॉलिवूड कलाकार अनेक असतील. त्यातलच एक ताज उदाहरण म्हणजे रातोरोत सोशल मिडीयाचं आकर्षण ठरलेली राणू मंडल..

रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा त्यांचा व्हिडीओ कुणीतरी मोबाईलमध्ये शूट करुन इंटरनेटवर अपलोड केला. हा व्हिडीओ हिमेश रेशमियाने पाहिल्यानंतर राणू मंडल यांना आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर राणू मंडल प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांच्या आवाजाने त्यांनी अनेकांची मनं जिकंली होती. मात्र, त्यांचं हे यश फार काळ टिकलं नाही.

त्यांचं झालं असं, एक चाहती सेल्फी घेण्यासाठी राणू मंडल (Ranu Mandal) यांच्याकडे गेली असता यांनी तिला सेल्फी देण्यास नकार दिला होता. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होत. यानंतर पत्रकारांसोबत उद्धट व्यवहार करतानाचाही व्हिडीओ बराच व्हायरल झाला. अशा तऱ्हेने सोशन मीडियाचं आकर्षण ठरलेल्या राणू मंडल यांना ज्या नेटकऱ्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवलं त्यांनीच पुन्हा त्यांना जमिनीवर आपटलं आहे. आता हिमेश रेशमीयासह फिल्म जगतानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. राणू मंडल यांच्यावर पुन्हा तीच वेळ आली आहे. त्या पुन्हा आपल्या पश्चिम बंगालमधील घरी रहायला गेल्या आहेत. आता त्या पुन्हा स्टेशनवर गाणार असल्याच्याही वावड्या उठल्या आहेत.

Updated : 6 March 2020 12:16 PM GMT
Next Story
Share it
Top